जेव्हा नजरेला नजर भिडते हृदयाची धडधड क्षणभर थांबते अधराला शब्दही फुटत नाही पापणीही अकारण खालीवर होते बधीर होतात सारी इंद्रिये स्तब्ध राहूनही देह लटपटते केसाची बट गालावर येता मागे सारण्यास हात ही थरथरते डायरीत दिलेली प्रेमाची कबुली तुला बघताच स्वतःशीच रेंगाळते तुला डोळा भरून पाहावेसे वाटते पण तरीही नजर मातीतच रूळते तुलाही असेच काही होत असेल? का राहून राहून मी मलाच विचारते मग हळूच हवा कानात कुजबुजते आणि हे मन अधिकच सैरभैर होते काहीतरी हातून निसटल्यागत वाटते आणि काहीतरी नवे मिळल्यागत होते लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine