आज माझ्याकडे जगायला वेळचं वेळ आहे पणं करायचं कायं तेचं माहित नाही, लोकांना भेटाव तर तशी परिस्थिती नाही आणि फोन वर बोललो राव पणं त्यात ती मज्जाच नाही, छंद खुप आहेत सगळ्यांनाच असतात पण ते छंद पण ह्या काळात दैनंदिन केले जातात त्यामुळे त्यातही विशेष अस काही उरले नाही, आराम हवा होता तेव्हा तोंडाला फेस आला तरी आराम काही मिळतचं नव्हता आणि आता मिळतो तर तो इतका की आता तो ही पचत नाही, ह्यातचं आयुष्य संपत चाललंय सारं पण सद्यपरिस्थितीत करायचं काय हे कळतं नाही, जायची वेळ जसजशी जवळ येईल तसतस उमजेल की व्यस्त असताना कसा काढायला हवा होता वेळ आणि आराम झाल्यावर कसा करायला हवा होता वेळेचा सदुपयोग परंतु उत्तर मिळेल तेव्हा हातात वेळचं उरणार नाही. 🍁मन एक लेखणी... ©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून... प्रेरणादायी विचार...