Nojoto: Largest Storytelling Platform

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘

 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असं(च) म्हणतात.

अशावेळी प्रश्न पडतो तो हा, की ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणजे नेमका कोण? पक्षातली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जेव्हा म्हणतात की, मी ‘सामान्य कार्यकर्ता’- तर मग त्यांच्यापेक्षा चार पायऱ्या खाली असणाऱ्यांना काय म्हणायचे? की उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना ‘मी चार पायऱ्या खाली उतरतोय’ असं सांगायचे असते? की ‘मला तुम्ही एवढे सामान्य समजत असाल तर मग प्रश्नच संपला!’ असा गर्भित वगैरे इशारा द्यायचा असतो?
थोडक्यात- ‘सामान्य कार्यकर्ता’ ही भाषणात, घोषणांत अत्यंत मूल्यवान असलेली गोष्ट- प्रत्यक्षात मात्र खोगीरभरती, हरकामे, निष्ठेची नशा चढलेले सरफिरे, आपल्यातल्या न्यूनगंडाला स्वामीभक्तीची झालर लावून ती जळीस्थळी दिसेल अशा धडपडीत असणारे. 

याशिवाय साहेबांची हरप्रकारे ‘मर्जी’ सांभाळणारे; दादा, भाई, नाना, तात्या, भाऊ यांचे सर्व प्रकारचे ‘हिशेब’ सांभाळणारे; त्यांच्या विरंगुळ्याची सोय पाहणारे आणि सत्ता, संपत्ती, दहशत यांच्या नशेत तरंगणाऱ्या या सर्वाना रात्री खांदा देऊन पलंगावर नेऊन झोपवण्यापर्यंत सगळी कामे हे सामान्य कार्यकर्ते करतात.

sandyjournalist7382

sandy

New Creator