भाव अंतरीचे.. शब्दांना लागेना आज अर्थ असे भाव जुळवू सांग प्रिये मी तुझे कसे मन झाले ते वेडेपिसे अंतरीचे बोल म्हणे तुच माझ्या हदयी वसे. सांग कसे , सांग कसे हे आज मज काय होतसे. फुलपाखरू होऊन भिरभिरतसे कधी इथे तर कधी तिथे तुच मज दिसे. श्रावणातील सौंदर्य किती ते नयनरम्य भासे तुच असावी जवळी असे मन माझे म्हणतसे. उधळुन हा आनंद लुटावा प्रेम आज हे सांगतसे क्षण क्षण भरून जगावे प्रेममय आपले जीवन हे असे.. कवी - सचिन झंजे. भाव अंतरीचे #Love