शिकस्त सुखात होते सोबत सारे संकट समयी दिसले नाही, गप्प राहिले मिळून अवघे तीळ मुखीचे भिजले नाही! आले त्यांना घास भरविला करू कशाला उहापोह तो, खरे सांगतो माझ्याखातर कधी त्याकडे शिजले नाही! बाप मुलीचा दीनवाणा नि सतत काळजी उजवायाची, कधी कुठे ना बाप पाहिला ज्याचे जोडे झिजले नाही! भल्या घरी ती लेक पडावी त्यासाठी मग रान जिवाचे, काळजातले भाव दाटले उगाच डोळे थिजले नाही! स्वप्न पाहिले भव्य दिव्य अन् सपाटाच बघ पूर्णत्वाचा, तहानभूक नि भुललो सारे नयन जराही निजले नाही! माळ यशाची खुणावते तर शिकस्त सारी कसून करतो, हुलकावणीस काय बिथरणे यत्नकुंड बघ विझले नाही! बरे जाहले सुचू लागले लिहू लागलो मी स्वच्छंदी, वाचक माझा अन् माझेही रसिकमन कधी विटले नाही! ® जयराम धोंगडे, नांदेड (९४ २२ ५५ ३३ ६९) ©Jairam Dhongade #paper