"भय "... (चित्र-काव्य) निघाली ती कातरवेळी, रस्ते रितेच होते. पाहिले वळून जेव्हा, मागावर बरेच होते. मुखवट्या मागे लपलेले, चेहरे खरेच होते. माणसां मधे पाहिलेले, श्वापद बरेच होते. ऐकुनी शिळेचा नाद, पाणावले डोळेच होते. काळीज जाळणारे ते, इशारे बरेच होते. घेतली उंच भरारी, शिकारी उभेच होते. पंख निष्पाप पाखरांचे, छाटणारे बरेच होते. संपली होती कातरवेळ, घर पुढेच होते. पाहण्यास सुखरूप मला, आतूर सारेच होते. -- अभय भोंगळे "भय"...