Nojoto: Largest Storytelling Platform

सरणारे वर्ष मी तुम्हासोबत उद्या असेल किंवा असणार

सरणारे वर्ष

मी तुम्हासोबत उद्या असेल किंवा असणार नाही
असेल कुणी दुसरे मित्रहो सदैव राहो तुमचे चेहरे हसरे
झाले असेल मजकडून तुमच्याशी वागताना भले वा बुरे चांगले वा वाईट
मीही बरोबर असतो खुपदा तरीही ठरतो मीच बरेचदा वाईट
मात्र त्याकडे लक्ष न देता सरळमार्गे चालूनीया मी नेहमी करतो माझे काम राईट....
माना अथवा नका मानू तुमची माझ्याशीही नाळ आहे
भले होवो वा होवो बुरे लक्षात ठेवा मी माझ्यातच काळ आहे....
उपकारही नका मानु अन् दोषही मजला देऊ नका
सदैव तत्वानं जगणाऱ्या लोकांना सत्वानं उरायला जागा
मिळणारच नाही असं कधी वागु नका
होईल माझाही अस्त कधी जरी माझ्या अस्तित्वाला डागाळू नका
अन् निरोप माझा घेताना वा निरोप मजला देताना
त्या स्मशानाच्या गेटपर्यंतही सोडायलाही येऊ नका
कारण उगवत्याला रामराम अन् मावळत्याला कायमचा सलाम
हिच रित आहे इथली हे कधीच विसरू नका....
असं समजुत करून घ्या मनीची की एक वर्ष आपली साथ होती
आता हसतमुखानं द्या निरोप मजला
बेधुंद असेल सारं जग उद्याच्या नववर्षाच्या स्वागताला
तेव्हाही मजला तुम्ही विसरा तो दोष देईन मी माझ्या प्राक्तनाला....
शिव्या शाप लोभ माया दुषणे यातले मज काही नको
मी सतत माझे काम केले अन् मी सतत
तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या भुभिकांना उत्तमरित्या वठवले
फक्त मजला उरू द्या मनात कायम आठवणरूपी
सुखचित्र म्हणूनी बाकी मजला काही नको....
निघत्या वेळी मी "पुन्हा भेटू" असं चुकुनही म्हणणार नाही
ते वचन कसे मी देऊ जे मला पाळताच येणार नाही
मी कोण तुम्हास सांगणारा फक्त मज तुमचे
आशीर्वाद घेऊनी शुभाशीष तुमचे घेऊ द्या
सरणारे वर्ष हे आता मलाही हसतमुखी त्या सरत्या वर्षासोबती
अनंताच्या प्रवासाला निघु द्या....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर 
#आयुष्य_जगताना