प्रेम म्हणजे स्वतःला एकदुसऱ्यात झोकून देणं एकदुसऱ्याच्या आयुष्याचा भाग होणं शरीर दोन आणि आत्मा एक असणं मरेपर्यंत एकदुसऱ्यासाठी प्रामाणिक असणं दुनिया विरोधात गेली तरी आपण एकमेकांच्या सोबत कायम असणं जात-पात,श्रीमंत-गरीब,धर्म-पंथ, उच्च-नीच दरी मोडून एकत्र असणं एकाला रडायला आलं तरी दुसऱ्याच्या डोळ्यात अलगद अश्रू येणं एकदुसऱ्यासाठी सगळ्या जगाशी लढण्याचा बळ असणं लाख जरी बोलले एकमेकांविरुद्ध तरी विश्वास अतूट असणं कितीही वादळ आलं तुफान आलं अगदी सुनामी आली तरी एकमेकांचा हात न सोडणं आपल्या प्रेमाला कुणीच हरवू शकत नाही एवढा पक्का विश्वास असणं एकमेकांना समजून घेणं आणि चुकलं तर समजावून सांगणं निसंकोच हवं ते एकदुसऱ्याला देणं आणि मागणं प्रेमा व्यतिरिक्त कुठलाही स्वार्थ मनात नसणं कोणाच्या बोलण्याने कोणत्या भीतीने सहज तुटेल इतका कच्चा प्रेम नसणं एकमेकांचं ऐकणं ऐकून घेणं निर्मळ मनाने व्यक्त होणं काहीही न लपवता सारं काही स्पष्ट सांगून नेहमी खरं बोलणं वागणं एकमेकांना स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही दगा न देणं कळत नकळत झालेल्या चुका स्वीकारून माफ करणं साऱ्या जगाला विसरून दोघेच आहोत असं अनुभवणं नात्याला हवी तितकी वेळ नेहमी देणं, आणि नात्याचा कंटाळा आलाय म्हणून पर्याय न शोधणं प्रेम म्हणजे मरण जरी आलं तरी कधीच वेगळं न होणं.... ©कधी प्रेम कधी विरह #happypromiseday