Nojoto: Largest Storytelling Platform

हळूच रस्ता 'तुझा" तू चुकवून तू पुन्हा कुशीत माझ्य

हळूच रस्ता 'तुझा" तू चुकवून 
तू पुन्हा कुशीत माझ्या येशील का रे..
तुझ्या पावलांच्या त्या सावलीने 
तू पुन्हा दारात माझ्या उभा राहशील का रे..
ओढ त्या इवल्याश्या हास्याची तुझ्या
तू पुन्हा माझ्या ओठांवर आणशील का रे..
नको समुद्रा एवढं प्रेम कुणाचं
तू पुन्हा त्या शांत लाटेतून वळून मला' बघशील का रे..
बघताना तुझ्या आठवणीत
तू पुन्हा आठवण बनुन येशील का रे..
डोळ्यांच्या पापण्यांवरच्या झरीला
तू पुन्हा तुझ्या प्रेमात वाहू देशील का रे

हळूच रस्ता 'तुझा" तू चुकवून 
तू पुन्हा कुशीत माझ्या येशील का रे

©Damini turare 
  #hand

#hand

195 Views