कोरोनाची लक्षणे नाहीत वेगळी , सर्दी खोकला ताप हिच आहेत सगळी खाणं पिणं ही अशक्य झालयं जगण्यातलं जीवन भयभीत झालयं कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं कोरोनाचं थैमान आलयं विषाणू सगळीकडे पसरतात तासंतास, म्हणून इतरांशी बोलणं ही अवघड होऊन बसलयं तोंडावर मास्क लावून फिरणं गरजेचं झालयं जगण्यातलं जीवन भयभीत झालयं कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं कुठे जायचे , कुठे नाही काहीच नाही कळत सगळीकडे म्हणतात कोरोना व्हायरस आलयं जगण्यातल्या मरणाचं कारण होउन बसलंय जगण्यातलं जीवन भयभीत झालयं कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं कोरोनाचं थैमान आलयं काळजी घेताना काही नाही समजत कोरोना व्हायरस काय आहे काही नाही कळत संशयाचं रडगाणं मनात येऊन राहिलयं जगण्यातलं जीवन भयभीत झालयं कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं कोरोनाचं थैमान आलयं कवी - विलास भोईर ( कोरोनाचं थैमान ) कोरोनाचं थैमान!