दोन व्यक्ती यावे एकत्र त्यांचे व्हावे मिलन सार्थक... मिलनातून प्रेमाने बापाने द्यावा गोळा तो चिखलाचा आईने स्वीकारावा तो गोळा पोटात आईने मेहनत करून घडवला त्याचा आकार.. न हात लावता न कुठली मशीन तो फक्त घडवावा विचारांनी अन् मनानी घडवावा त्याचा आकार.... बरेच दिवस लागली ती मूर्ति कारण घडवायला तिला उपमा कशी देता येईल गणपतीची सात दिवस झाले की जा पाण्यात विरघळायला.... तो ना गणपती ना कुठली मूर्ती तीना कुठली जोडता येणार म्हणून सर्वात मोठा 'मूर्तिकार' माझी "आई" असावी. कारण न चुकविला माझा कार तिने कुठे न सोडले छिद्र ना पोकळी. ती मूर्ती द्यावी आईने बाबांना प्रेमाने भेट वस्तू अन् बाबांनी ती प्रेमाने स्वीकारावी हीच माझी ठेवण.... आईने मूर्ती घडवली पण सोबत बाबांनीही तिच्यात विचारांचा भांडार व संस्काराची देवाण-घेवाण केली तर तो माझा सर्वात मोठा "ग्रंथकार". त्या मूर्तीत सतत उजाळा देणारे चुका दुरुस्ती करणारे माझे गुरुवर्य... नाशिक कर