बस्तीत आज माझ्या तू बघना येऊन जरासे झोपड्या सदर दिलांच्या पार खाक होत आहे चिठ्ठ्या चेतावणीच्या ना भेटल्या मला कधीही तरी अतिक्रमण सदर दिलावर बेबाक होत आहे मी बोललोच नाही त्यांच्या विरोधात काही तरी आरोप हे सगळे त्यांचे नापाक होत आहे जीवनात राहतो मी घेऊन भार भावनांचा पण त्यांच्या अनावराचा मला धाक होत आहे मलाच आपुल्यांनी आता परक्यात काढले रे ना खबर कुणाची ना कुठली हाक होत आहे - गोविंद अनिल पोलाड