Nojoto: Largest Storytelling Platform

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायल

 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली काही मोठी माणसं, आजीआजोबासुद्धा कधीतरी हट्ट करतातच की! असे अनेक प्रश्न पडतात. त्यासाठी हट्ट म्हणजे काय, या अगदी मूळ प्रश्नावर प्रथम विचार करू या.  

हट्ट मुळातच जर चुकीचा असेल तर कधी ठामपणे पण गोड शब्दांत तर कधी कठोरपणे त्या हट्टाला विरोध करावाच लागतो. पण हट्टाला विरोध हे आजारी पडल्यानंतरचं औषध झालं. आजार होऊच नये म्हणूनही काळही घ्यायला हवीच ना..

कोणत्याही वयातील हट्टी स्वभावाचे प्रमुख कारण असते, ते म्हणजे हट्ट करणा-या व्यक्तीला ‘घरात आपल्याला योग्य ते स्थान मिळत नाही, योग्य तो आदर मिळत नाही किंवा आपल्याकडे कुणाचे लक्षच नाही’, असं वाटणं. मुळात, मनात असणारी ही असुरक्षिततेची भावना, मग ती कोणत्याही स्वरूपाची असेल. ही असुरक्षितता इतरांना दिसू न देण्याचा किंवा आपले अस्तित्व जाणवून देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हट्ट!

sandyjournalist7382

sandy

New Creator