*आयुष्याची एक संध्याकाळ अशी असावी* आयुष्याची एक संध्याकाळ, अशीही असावी... पुनः पहिल्याच रात्रीसारखी, तुझी मिठी मला पडावी... तुझ्या हळूवार पवित्र स्पर्शाने ,माझा रोम रोम खुलावा... तुझ्याच हाताने माझा ,श्रुंगार पुनः सजावा... सर्वांसमक्ष तू माझ्यावर, चुंबने वर्षावी... बेभान होवून मजला, उरी कवटाळून धरावी... आवेग ओसरल्यावर तुझा, मिठी तू सैल करावी... विस्कटलेली माझी टिकली, तू अश्रूभरीत नयनांनी पुनः लावावी... मोठ्या हिमतीने मला,नवरीसारखी सजवून... तुझ्याच हाताने ,सरणावर ठेवावी... आयुष्यात एक,संध्याकाळ अशीच यावी... माझी प्राणज्योत तुझ्या, अंतरीच सामावून जावी... त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८ कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे#