Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्धेच्या धावपळीत मशीन झालोय सारे.. अपेक्षांच्या

स्पर्धेच्या धावपळीत
मशीन झालोय सारे..
अपेक्षांच्या ओझ्यांचे 
वाहतोय फक्तं वारे..

संपत्तीच्या गणितामध्ये 
नाही कळत लहान थोरे..
मोहमायेच्या खोट्या दुनियेत
बघत रहावे तोरे..

अडचणीच्या काळामध्ये 
सर्वांची बंद होता दारे..
बंद झालेली दारे बघुनी
येता अंगावर शहारे..

अवकाशात भर दिवसाही
चमकतात चंद्र तारे..
ते दिसत नाही कारण
आम्ही मशीन झालोय सारे...

आम्ही मशीन झालोय सारे..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  मशीन