Nojoto: Largest Storytelling Platform

*#गाव म्हणजे काय असता?* गाव म्हण

*#गाव म्हणजे काय असता?*

                 गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे  तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता.
चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता...

                     *माझ्या लेखणीतून...🖋️* 
                     *योगेश लवू कांबळी...*

©Yogesh Lawoo Kambali #gaon gaav mhanje kay asata...
#malavanilekh

#faraway