भावना उचंबळून येतात तेव्हा डोळ्यात येऊन बसतो पाऊस आनंदाने मन भरुन येताना गालावर हळुच नाचतो पाऊस 1 आठवणीत तुझ्या सख्या डोळ्यात थिजुन बसतो पाऊस कधी रडवतो खुप मनाला कधी ह्दयात हसतो पाऊस 2 सांगता येत नाही वेदना तेव्हा मुका होऊन बसतो पाऊस रात येते तुझ्या शिवाय विरहाने व्याकुळ डसतो पाऊस 3 अंगावर पडता रिमझिम धारा मनात माझ्या ठसतो पाऊस चिंब चिंब भिजुन मला बाहुत तुझ्या कसतो पाऊस 4 कधी हसवतो कधी रडवतो कधी वेडाच असतो पाऊस तुझ्या आठवणीत रडुन सुद्धा कधी येत नसतो पाऊस 5 दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh पाऊस