#OpenPoetry जेव्हा तू होतीस.. पहिला दिवस तो कॉलेज चा ... न कळत जेव्हा सोबत बसलो.. अन् नवीन मैत्रीचा ऋतु सुरू झाला... तेव्हा तू होतीस.. कॉलेज च्या अड्यावर सोबत जेव्हा मस्ती करायचो.. अन् तास न तास गप्पा मारायचो.. तेव्हा तू होतीस.. माझ पहिल प्रेम मी जेव्हा व्यक्त केलं... आणि हरवलं सुद्धा..तेव्हा सावरायला.. तू होतीस.. विरहाच्या त्या दुःखा मधून, एकमेकींना सावरत जेव्हा अतूट नातं निर्माण झाल... तेव्हा ही तू होतीस.. तास न तास पेपर लिहीत असताना एकमेकीं साठी थांबायचो.. तेव्हा तू होतीस... परीक्षां मधल्या KTया पण एकत्र मिळून सोडवल्या.. त्या प्रत्येक कष्टात साथ दिली... तेव्हा तू होतीस.. प्रत्येक वेळी भांडून जेव्हा पुन्हा एकत्र यायचो.. तेव्हा तू होतीस.. जेव्हा जगलो तो सोनेरी काळ आयुष्याचा.. त्या प्रत्येक प्रवासात सोबतीला.. फक्त तूच होतीस.. माझ्या हसण्यात,माझा राडण्यात.. नेहमी जिची आठवण येत राहिली..ती तूच होतीस.. कोणापुढे ही व्यक्त ना होणारी मी..जीच्याकडे व्यक्त व्हायचे.. ती तू होतीस... अन आज आयुष्याच्या एक वळणावर..ना तू माझा सोबत.. ना मी तुझा सोबत.. तुला कळलं नसेल कदाचित माझा साठी तू कोण होतीस.. अन आता सगळे आहेत सोबतीला.. पण फक्त तूच जवळ नाहीस नेहमी सारखी.... -श्रावंती