चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही ** मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही ** धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी ते सुख मजला आजही कसे मिळत नाही *** वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा षड् रीपू माझे अजून काही जळत नाही ** प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?