कविता म्हणजे काय असते ? कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते मोजक्या शब्दांत अनुभवांचं भाष्य असते ! प्रत्येक शब्दांत अनेक मनांना स्पर्श करते प्रत्येक मनाला अनेक आठवणींशी जोडते ! कविता नातीगोती जातीपातीच्या पलीकडे असते कशी कुणास ठाऊक सातासमुद्रापार पोहोचते ! कधी हसवते तर कधी रडविते कधी घडविते तर कधी बिघडवते ! कधी विचारात पाडते तर कधी विचारांच्या गोंधळातून सोडविते ! कविता मनावरचं ओझं खुंटीला टांगून येते काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते ! काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !!! - संतोष लक्ष्मण जाधव. #कविता म्हणजे काय असते ?