//पाऊस// रूप तुजे अनेक, अनेक नाव बरसता तुरे ,सदैव सुखी जीव कुठे असे मेघा सांग तुझे गाव क्षणोक्षणी बदले कसे तुझेभाव जीव लाडका तुही असे कवींचा दूत तू असे रे निसर्गाचा तुही श्वास रे कास्तकऱ्याचा जिव प्राण असे प्राणीयांचा तुझी ओड रे लागे धरणीस शोधी चातक दैव रूप तुझियात देवा वरुणा तुझे आम्ही दास तूच आमुच्या सदैव असे हृदयात संथ तूझे रूप सुंदर असे मोहक रूप दुष्काळी वाटे हृदयास दाहक महापूरी रूप तुझे जसे बकासुर जणू धरणीवरी अवतरे यमाचे वाहक बारसुनि वेळोवेळी कर आबाद जीवना नको दाखऊ पावसा रौद्र रूप तू मानवा मोडू नको संसाराची घडी तू पावसा तुच आमुचा पांडुरंग तूच ज्ञानदेवा //काव्य रचना// 📝संदिप नानासाहेब वाकडे रा.खेडा ता.कन्नड जी.औरंगाबाद 📲9766992776 दिंनाक.16/8/2019 सहशिक्षक- श्रीमती कस्तूरबा इंग्लिश स्कूल चापानेर तालुका सह-सचिव -भाषा ,साहित्य,संस्कृती मंडळ,कन्नड,औरंगाबाद #पाऊस