❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा तिसरा काँल आहे.काही भांडण झालयं का तुमच्या दोघांच?सायली प्रश्नांवर प्रश्न विचारत चालली होती.नेहा मात्र शांतपणे छताकडे बघत पडली होती.सायलीला कळत नव्हते की काय झालय ह्या मुलीला.आजकाल काय ही अशी विचित्र वागत आहे अशी.तेवढ्यात तिचा फोन वाजला म्हणुन सायली बोलत बोलत बाहेर पडली. नेहा आणि सायली गेले वर्षभर सोबत रहात होत्या ह्या मुलींच्या हाँस्टेलवर.सायली एका आयटी कंपनीमधे लागली आणि पुण्यात आली होती.त्याच दरम्यान नेहा ही नागपुर वरुन इंजिनिअरिंग करुन पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आली होती.कंपनीच्या जवळ हाँस्टेल म्हणुन दोघीही तिथेच आल्या व त्यांची ओळख झाली होती.पहिल्याच भेटीत दोघींनाही एकमेकींविषयी चांगल्या भावना वाटल्या व त्यांनी एकाच रुम मधे रहायचे ठरविले होते.आणि आजपर्यंत त्या मस्त जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या. पण गेले काही दिवस नेहा मधे बराच बदल दिसत होता.हसरी मस्ती करणारी नेहा जरा स्वत:मधेच रहात होती आजकाल.आपणही कामाचे टेंशन असेल म्हणुन जरा कानाडोळाच केलाय.पण आज जरा बोलावेच लागेल असे दिसते आहे म्हणत सायली कामाला लागली. नेहाला आज सुट्टी असुनही काही उत्साह वाटत नव्हता.रोहनचे तीन काँल येऊन गेले.तेही आपण उचलले नाहीत पण त्याला काँल करुन आपण आज भेटु शकत नाही.बिझी आहोत असे सांगावे का असा विचार तिच्या मनात आला.पण तेही न करता अशीच लोळत पडली होती.तेवढ्यात सायलीने बोलत बोलत तिच फोन हातात दिला.रोहन होता फोनवर.नेहा फोन का उचलतं नाहिये विचारायला त्याने सायलीला काँल केला होता.रोहनशी मोघमच बोलुन नेहाने फोन ठेवला.फक्त हो नाही असेच उत्तर देत होती ती.