सरितेचा प्रवाह अडथळ्यांना थांबला नव्हता अविरतपणे वाहताना संथ कधी झाला नव्हता अपयशाने पाठलाग सोडला जवळ येता येता जणू प्रयत्नांच्या प्रेमात कधीच पडला नव्हता कोमेजून सुकतात काही स्वप्ने वाट बघता बघता ज्यांना साकार होण्यासाठी मार्ग भेटला नव्हता विसर पडतो सुरक्षित परिघामध्ये जगता जगता स्वप्नांना गोंजारायला पुरेसा वेळ मिळाला नव्हता दमछाक झाली राधिकेची मधुबनात नाचता नाचता अक्षय, तिला सांभाळला कृष्ण धावून आला नव्हता - अक्षय समेळ ©AKSHAY SAMEL #sagarkinare #अक्षयसमेळ #akshaysamel #मराठीकविता #मराठीगझल #यश_अपयश