|| निरागसता || आईवरचं प्रेम तुझं चेहर्यावरून ओसंडतय त्या प्रेमाची ऊब मला फोटोतही जाणवतेय || निरागस आहेस तोवर असाच कुशीत राहशील पंखात बळ आलं की भूर्रर्र.... उडून जाशील ॥ तुझ्या रम्य बाळलीलांनी आयुष्य माझं बहरलं तुझ्या मुग्ध स्मिताने जीवन माझं उजळलं ॥ हसत राहा, बहरत राहा सर्वांचे जीवन फुलवत राहा तुझ्या तीव्र बुद्धीने सारे जग जिंकत राहा ॥ तुझ्या प्रज्ञाक्षमतेला नको दिशांचे बंधन तुझ्या सद् विचारांचे राहो सुमंगल गठंन || ...........आकांक्षा केळकर ©Akanksha Kelkar #momsonlove