कडक उन्हात मिळावी ती सावली होती आजी माझी मायेची बाहूली होती स्वार्थी जगात मिळते आपुलकी कोणाला निस्वार्थ स्वभावाची ती माऊली होती भक्ति करतात लोक नऊ दिवस ज्याची आजी च्या रुपात तीच मला पावली होती वृद्धकाळात पण न केला विचार स्वतःचा दुसऱ्यांसाठी सतत तत्पर ती राहिली होती फुलांचा पाऊस आणि अश्रूंचा वर्षाव झाला जेव्हा लक्ष्मीबाई ला श्रद्धांजली वाहिली होती. _ प्रदीप भिसे ©Pradip Bhise dedicated to grandmother #Mother