ना थांबला श्वास, ना तुटले पाश हेही जातील दिस, एकदाचे | असो विठ्ठल मनी, विठ्ठल ध्यानी मन विठ्ठल जाणी, एकेकाचे ||धृ|| घरच्या घरी, होऊ वारकरी भक्तीच्या घागरी, भरु आता | ऊधानले तरी, मन सावरी सावरी आज तुझी पायरी, ठेवू माथा || नाम घेता ओठी, हरली भिती, ऊनपावसाची क्षिती, नसे मज | नको सोडणे गाठी, उलट्या हाती तु असणे सोबती, कळे आज || //आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा// ©Dileep Bhope #आषाढी_एकादशी