हे बाप्पा काय हे !! ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत, काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती, बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे. मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की 2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते, आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत, काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती, बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.