Nojoto: Largest Storytelling Platform

#पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला.... आषाढी सरल्य

#पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला....
आषाढी सरल्यावर रिती होई ही पंढरी
अन् ओस पडे ते विठुरायाचं रे राऊळ
अशी एकाकी का व्हावी एकादशी ll१ll
मग नसे तयाठायी हरीनामाचं गुंजन
नसे टाळचिपळीचा ब्रम्हवेणुनाद
घरोघरी परतसे तेव्हा संचिताचे सुख घेऊनी
अमुचा तो राजीयांचा राजा वारकरी ll२ll
तुझी लीला म्हणु की म्हणु देवा ही माझी सत्वपरिक्षा
सोपान हा दुजा ज्ञानदिप जणु नवा
तुझ्या आत्मतत्वाचा रे पांडुरंगा ll३ll
तुझ्या लेकरात अन् तुझ्यात जाणुन-बुजुन तु ठेवी रे अंतर
अंतरीचा विठोबा आम्हास गवसण्या ll४ll
फिरूनी नव्यानं भेट होई तुझी आम्हा
प्रत्येक भेटीत तुझे विश्वस्वरूप तु दावतसे ll५ll
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देव_माझा_विठोबा
#पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला....
आषाढी सरल्यावर रिती होई ही पंढरी
अन् ओस पडे ते विठुरायाचं रे राऊळ
अशी एकाकी का व्हावी एकादशी ll१ll
मग नसे तयाठायी हरीनामाचं गुंजन
नसे टाळचिपळीचा ब्रम्हवेणुनाद
घरोघरी परतसे तेव्हा संचिताचे सुख घेऊनी
अमुचा तो राजीयांचा राजा वारकरी ll२ll
तुझी लीला म्हणु की म्हणु देवा ही माझी सत्वपरिक्षा
सोपान हा दुजा ज्ञानदिप जणु नवा
तुझ्या आत्मतत्वाचा रे पांडुरंगा ll३ll
तुझ्या लेकरात अन् तुझ्यात जाणुन-बुजुन तु ठेवी रे अंतर
अंतरीचा विठोबा आम्हास गवसण्या ll४ll
फिरूनी नव्यानं भेट होई तुझी आम्हा
प्रत्येक भेटीत तुझे विश्वस्वरूप तु दावतसे ll५ll
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देव_माझा_विठोबा