असंख्य वेदना शरीरावर होऊनही, जे स्वराज्यासाठी लढले होते. आमचे छत्रपती शंभूराजे ते जे औरंग्यास चांगलेच नडले होते, खूप छळले शंभू राजांस औरंग्याने, मरण यातना ही दिल्या फार, म्हणे स्वराज्य दे,नाक घास, आणि धर्म ही आमचा स्वीकार. हार मानतील लगेच असे ते राजे नव्हते, छावा होते ते,सळसळते रक्त शिवरायांचे होते. शूर शिवबाचे शूर छावा कुठेही डगमगले नव्हते, असंख्य वेदना अंगावर घेऊन ही उलट औरंग्याला नडले होते. शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर लढवय्या शंभूराजांचे आज स्मरण करूया. लिहुया काहीतरी प्रेरणादायी, आवेशपूर्ण... आताचा विषय आहे 'शंभूराजे' #शंभूराजे #शंभूराजे1