तुच फासला शेंदूर दगडाला, देव बनवूनि देव्हारी बैसविला, आता घालशील जी गाऱ्हाणी, सांग तो कैसा पुरविल त्याला। न पुरवता तुझे इच्छित तो, उद्या कोसशील मग स्वतःला, वाटेल कोठुनी सुचली दुर्बुद्धी, कसा माझा मार्ग हा चुकला। उडेल बघ विश्वासच मनीचा अवघा, खऱ्या देवावरून ही तुझा बाई, उघडूनिया आजच दोन्ही डोळे, खरा देव तुझा तू ओळखुनी पाही। #देव #देव्हारा #शेंदूर #दगड #प्रेम #मार्ग #yq_gns