Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं... असं क

प्रेम हे प्रेम असतं..
तुमचं आमचं सेम असतं...
असं काहीच नसतं.
प्रेम हे जरी प्रेम असलं
तरी त्यात फरक असतं.
आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं
तर इतरांचं प्रेम बकवास असतं.
खोटं नाही खरं तेच सांगतो,
प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं.
असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं,
हल्लीच प्रेम म्हणजे बाजार,
कुठेही पाहायला मिळतं.
प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं
पण ते इतकही जगजाहीर नसावं
की काहींच्या डोळ्यात खुपसाव.
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
प्रेम हे प्रेम असतं..
तुमचं आमचं सेम असतं...
असं काहीच नसतं.
प्रेम हे जरी प्रेम असलं
तरी त्यात फरक असतं.
आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं
तर इतरांचं प्रेम बकवास असतं.
खोटं नाही खरं तेच सांगतो,
प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं.
असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं,
हल्लीच प्रेम म्हणजे बाजार,
कुठेही पाहायला मिळतं.
प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं
पण ते इतकही जगजाहीर नसावं
की काहींच्या डोळ्यात खुपसाव.
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...