Nojoto: Largest Storytelling Platform

माझा प्रवास नसेल मज पंख परि उडण्याची आस उरी न म

माझा प्रवास

नसेल मज पंख परि
उडण्याची आस उरी
न मजपाशी धन दौलत
शब्दांची रास माझ्या उरी

जव खिन्न मनाने पडलें कोपऱ्यात
देई प्रकाश निराशेच्या अंधारात ही
 दरवळत राही सुगंध तयांच्या वाटेत 
काव्याने भरले क्षण आशेने हे माझे
 
रंग गंध भावना नि सुखा ची गुंफण
दुःख दारिद्र्य पदराच्या गाठी ची स्पंदने
ओळख करून देऊ तयांची या जगा
हाच ध्यास घेतला या मनात

कविता हाच ध्यास मना मनात
तिची मैत्री ही अथांग सागरा परी
न जाणो कोठून आली या जीवनात
काव्यप्रेमी हाच माझा प्रवास

# 21 मार्च ....
जागतिक कविता दिनाच्या सर्व काव्याप्रेमी व कवींना खुप खूप शुभेच्छा....@

©Jaymala Bharkade #जागतिक कविता दिन💖🤗🎈
माझा प्रवास

नसेल मज पंख परि
उडण्याची आस उरी
न मजपाशी धन दौलत
शब्दांची रास माझ्या उरी

जव खिन्न मनाने पडलें कोपऱ्यात
देई प्रकाश निराशेच्या अंधारात ही
 दरवळत राही सुगंध तयांच्या वाटेत 
काव्याने भरले क्षण आशेने हे माझे
 
रंग गंध भावना नि सुखा ची गुंफण
दुःख दारिद्र्य पदराच्या गाठी ची स्पंदने
ओळख करून देऊ तयांची या जगा
हाच ध्यास घेतला या मनात

कविता हाच ध्यास मना मनात
तिची मैत्री ही अथांग सागरा परी
न जाणो कोठून आली या जीवनात
काव्यप्रेमी हाच माझा प्रवास

# 21 मार्च ....
जागतिक कविता दिनाच्या सर्व काव्याप्रेमी व कवींना खुप खूप शुभेच्छा....@

©Jaymala Bharkade #जागतिक कविता दिन💖🤗🎈