Nojoto: Largest Storytelling Platform

White पाहतो पिरपिरी तर कधी ढगफुटी पाहतो... चिंब ओ

White पाहतो

पिरपिरी तर कधी ढगफुटी पाहतो...
चिंब ओली उभी मी कुटी पाहतो!

राजकारण तशी रोज धोकाधडी...
माणसांचीच फाटाफुटी पाहतो!

संकटाला कुणी सोबतीला नसे...
नेहमी माणसे पळपुटी पाहतो!

ना करत जो भले कोणते काम तो..
त्यास मी मारतांना खुटी पाहतो!

रोग फैलावला कोणता हा नवा...
एक बटव्यात नामी बुटी पाहतो!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Free
White पाहतो

पिरपिरी तर कधी ढगफुटी पाहतो...
चिंब ओली उभी मी कुटी पाहतो!

राजकारण तशी रोज धोकाधडी...
माणसांचीच फाटाफुटी पाहतो!

संकटाला कुणी सोबतीला नसे...
नेहमी माणसे पळपुटी पाहतो!

ना करत जो भले कोणते काम तो..
त्यास मी मारतांना खुटी पाहतो!

रोग फैलावला कोणता हा नवा...
एक बटव्यात नामी बुटी पाहतो!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Free