रामेश्वर आणि मी लंगोटी यार...आमच्या चार-पाच जणांच्या टोळक्याची गावातही हवा आणि शाळेतही हवा...सुट्टी घ्यायची तर वेगवेगळे अर्ज न करता एकाच अर्जावर सर्वांच्या सह्या घेतल्याचा विश्वविक्रम आमच्याच नावावर,अर्थात अर्जदार जरी वेगवेगळे असले तरी विषय मात्र एकच असायचा "क्रिकेट"...रामेश्वर आमच्यात शरीरयष्टीने ब-यापैकी मग आम्हाला त्याचा खूप आधार वाटायचा..."मित्रासाठी कायपण" हे त्याच ब्रीदवाक्य...मग मित्रासाठी स्वकियांन्ना विरोध करणे असो की मित्राच्या वडीलांच्या दशक्रियेला स्वतःही केसअर्पण करणे असो,खूप सा-या गोड आठवणिंन्नी आमची मैत्री संपन्न आहे...ज्याला आपलं माणलं त्याला चड्डिही सोडून देण्याचा त्याचा स्वभाव अजुनही कायम आहे आणि पुढेही राहील याची पूर्ण खात्री आहे...सांगण्यासारखे खूप आहे परंतू काही गोष्टी सार्वजणिक बोलायच्या नसतात...मला वरवर बोलता येत नाही पण रामेश्वर खरच दोस्तिच्या दुनियेतील राजा माणूस आहे...त्याचा आज वाढदिवस ,आज खरं तर त्याच्यापर्यंत केक घेवुन पोहचण्याची खूप इच्छा आहे पण नाविलाज आहे... शेवटी एवढच सांगेन... काय भेट द्यावी तुला,प्रश्न असा पडला रम्य एक सायंकाळ,त्यावर चंद्र जडला ता-यांन्नी लगडलेले,डोईवर आकाश खुले तुला देण्यासाठी माझ्याकडे,हिच शब्दफुले. खूप खूप आनंदी राहा...हॅप्पी वाला बर्थडे मित्रा...!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐