ती शय्या मखमालीची राधेस टोचते आता, का कान्हा वळला नाही यावेळी जाता जाता! माझ्याहुन काय असावे कान्हासी इतके प्रिय? पाव्याला जागच नाही सुर निजून गेले काय? धूसरशी काळी छाया मग पडली अंगावरती ते कुरुक्षेत्र का नाचे त्याच्या अन माझ्याभवती तो तिथेच अडकुन पडला पार्थाच्या मोहापायी गीतेच्या जन्मापुढती राधेची यादच नाही. ती येते सौधावरती मग थेट गवाक्षी जाते ती भिरभिरते एकाकी कान्ह्याची वाट पहाते. @गुढ ©Saumitra Joshi #ती शय्या मखमालीची #DearKanha