पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं गुंगी वर आली गुंगी सोंग घेतलं झोपेचं कसं डोळ्यांनी शेंदावं पाणी पहिल्या खेपेचं चूल पेटून हिजली दिस बुडत्या वक्ताला नवसाचा गेला नुर देव पावंना भक्ताला थुका गिळून पोटात सारी झोपली उपाशी फास घेवून हातात यम थांबला खोपाशी गेल्या जन्माची विठ्ठला फळा येवू दे पुण्याई थोडी पाऊस पाण्यानं वाहू देरे गंगामाई 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं