गझल - ए - महामाया पिढीचा दोर आहे तो. घराचा चोर आहे तो. गरीबी लाजवी त्याला, दिलाचा घोर आहे तो निखारे झेलतो आम्ही, तरी कमजोर आहे तो. करुनी यातना साऱ्या, जिवाचा पोर आहे तो. करीता माफ सारे ते, मुका घनघोर आहे तो. समंजस दार माझे ते, निनावी शोर आहे तो. विकूनी टाक साऱ्यांना, शिकारी मोर आहे तो. समजतो काय स्वतःला, वयाने थोर आहे तो? कुलदिपक नाव देता का? विझलेली लोर आहे तो. ©Nishigandha Kakade #मनातलं_पानात#माझी_गझल