मेणाहून मऊ होणाऱ्यानं वज्राहूनही कठोर होण्याची क्षमता स्वत:मध्ये वेळीच विकसित केली पाहिजे, हेच या प्रश्नावरचं सगळ्यात प्रभावी उत्तर आहे. बोटभर उसवलेलं असेल तर टाका घालता येतो, पण हातभर फाटलं असेल तर? “इतकं होईपर्यंत तुम्ही काय करत होतात?” हा प्रश्न येणारच... पालकमित्रांनो, स्वत:ला वेळीच बदला किंवा या प्रश्नाचं समोरच्याला पटेल असं विश्वासार्ह उत्तर चांगलं तोंडपाठ करून ठेवा...! #uwots #मुलांचाविचार #पालक #parents @nojoto @uwots @SharmilaS_Diary✍🏻