खेकडे उगाच बदनाम होतात.. एकमेकांचे पाय ओढण्याची आमची खेकडावृत्ती माणसाने सहज अंगीकारली. संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने आधीच पोखरलेली पोकळ धरणे मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून गेली. आमचा दोष एवढाच मोडकळीस आलेली धरणे आम्ही निवारा म्हणून निवडली. परंतु हीच आश्रयस्थाने आमच्या कुळास कलंक लावून गेली. धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती माणसाच्या वेशात अवतीभवती फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला. परंतु निरपराध मानवी हत्येचे आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला. तुमच्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आम्हाला उगाच ओढू नका. आधीच जगणं मुश्किल केलंय भक्षकांनी त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका. - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.