Nojoto: Largest Storytelling Platform

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== ए

 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्या वाऱ्याला साथ देते. जमिनीवर या टोकापासून एक छान लाट तयार होते. खूपच नेत्रसुखद चित्र असतें. मोदी बोलायचे आणि सभेतील लोक आरंभ तें अंतापर्यंत गवताप्रमाणे डुलायचे. एका लयीत व्हायचे सगळे. कुठलाही कृत्रिमपणा नव्हता. पण गवतला कुठे माहित असते, आपण कुणाचा तरी चारा आहोत. तसेच सभेतील लोकांचे झाले. मोदी यांनी दिलेली आश्वासने साफ खोटी निघणार आहेत, जनसमूहाच्या मनात सुद्धा आले नाही.

मोदी यांच्या अच्छे दिन याबाबतीत काहीच शंका नव्हती. शेतकरी, युवक तसेच महिला या सर्व वर्गाला, मोदी यांनी स्वप्ने दाखविली होती. मग शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव असेल. बेरोजगार तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार असेल. महिलांना महागाई कमी करण्याचे आश्वासन असेल. धर्मांधता व तुष्टीकरण करण्यासाठी नवे “सबका साथ सबका विकास” असेल. हे सगळे मोदी यांनी लावलेला सापळा होता. भारतीय मतदाराला अडकविण्यासाठी.

भारतीयच नव्हे तर, जगातील सगळ्या विकसनशील देशातील, प्रत्येक राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी असली दिशाभूल व खोटी आश्वासने देतोच. भारतात तर हे सर्रास होते. भारतीयांना याची सवयच आहे. मग मोदी यांचे काय चुकले. लोकसभा निवडणुकीत मोदींना पाशवी बहुमत मिळाले. लोकांनी मोदींच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. गुलामगिरीची मानसिकता असलेल्या भारतीयांना सुद्धा असा कोणीतरी नेता हवाच असतो. अगदी गल्लीत असलेल्या भाईसुद्धा चालतो.

sandyjournalist7382

sandy

New Creator