Nojoto: Largest Storytelling Platform

चित्रामधूनी दिसतो आहे रस्ता केविलवाणा रयाच गेली भ

चित्रामधूनी दिसतो आहे रस्ता  केविलवाणा
रयाच गेली भग्न जाहल्या साऱ्या पाऊलखुणा
बंद वाहने, बंद दुकाने कळकटलेल्या भिंती.
फलकांवरती नाव पुसटसे काजळलेली
बत्ती.

कचराकुंडी विखुरलेली रस्त्यावरती साऱ्या
धुळ वेढूनी बसला आहे सारा रंग पसारा
धुरकटलेल्या तारांवरती घुसमटलेला वारा
 काळोख्या रात्रीस वेढतो शांत मग्न पहारा

भयाण गल्ल्या, भकास रस्ते भीषण दिसते सारे
सुन्न कोरड्या आकाशातून मावळलेले तारे
जागोजागी विखुरलेली ओंगळवाणी नक्षी
धूसरलेले भयाण सारे भेदरलेले पक्षी

गूढ शांतता नांदत आहे मनामनातुन येथे
भुतकाळाच्या आठवणींशी जोडत जाते नाते
उध्वस्थ मने, उध्वस्थ चरे, उध्वस्थ पोकळी आहे
चित्रामध्ये वसणारे ते शहर हरवले आहे.

रंग फिकूटले, नभ कोंदटले तरी उजळते आहे
उगवत्या सुर्यास उद्याचे दान मागते आहे.

अर्चू.. #चित्रकविता
चित्रामधूनी दिसतो आहे रस्ता  केविलवाणा
रयाच गेली भग्न जाहल्या साऱ्या पाऊलखुणा
बंद वाहने, बंद दुकाने कळकटलेल्या भिंती.
फलकांवरती नाव पुसटसे काजळलेली
बत्ती.

कचराकुंडी विखुरलेली रस्त्यावरती साऱ्या
धुळ वेढूनी बसला आहे सारा रंग पसारा
धुरकटलेल्या तारांवरती घुसमटलेला वारा
 काळोख्या रात्रीस वेढतो शांत मग्न पहारा

भयाण गल्ल्या, भकास रस्ते भीषण दिसते सारे
सुन्न कोरड्या आकाशातून मावळलेले तारे
जागोजागी विखुरलेली ओंगळवाणी नक्षी
धूसरलेले भयाण सारे भेदरलेले पक्षी

गूढ शांतता नांदत आहे मनामनातुन येथे
भुतकाळाच्या आठवणींशी जोडत जाते नाते
उध्वस्थ मने, उध्वस्थ चरे, उध्वस्थ पोकळी आहे
चित्रामध्ये वसणारे ते शहर हरवले आहे.

रंग फिकूटले, नभ कोंदटले तरी उजळते आहे
उगवत्या सुर्यास उद्याचे दान मागते आहे.

अर्चू.. #चित्रकविता