वासनांध झालेल्या अशा भडव्यांना भर चौकात गोळ्या घालावंसं वाटेल जरी बांधले इथे हात कायद्याने सगळ्यांचे हातात असेल तुमच्या बंदूक जरी... कित्येक होतात इथे बलात्कार रोज मोकाट फिरतात असे आरोपी तरी फक्त काढायचं कॅण्डल मार्च अनं करावं आक्रोश डोळ्यासमोर होईल कोणाचा बलात्कार जरी... लिहिलं कितीही ताकदीने विद्रोह करून कवींनी वाचून इथे पेटतो, उठतो,लढतो कोण तरी वासनांध बलात्कारी फिरतो नेहमीच मोकाट लाखो च्या संख्येने जरी येईल जनता रस्त्यावरी... तुरुंगात मिळेल बिर्याणी अनं सोयीसुविधा त्यांना रोज करतील असे निर्घृन पाप जरी येतील घटनेतील कलमे आड आपल्या असे रोज आपल्या नजरे समोर घडेल तरी... राजकारण चालेल थोडाफार लोकांना भुलवायला अनं न्यायालयात चालेल खटला कित्येक वर्षावरी फिरतील असेच वासनांध पापी मोकाट जोपर्यंत घडणार नाही असे प्रत्येकाच्या घरी... चिडतील,लढतील,मोर्चे काढतील प्रशासनाच्या विरोधात अनं पडतील डंडे पोलिसांचे आपल्याच ढुंगणावरी सुटतील निर्दोष वर्षनुवर्षे असे बलात्कारी कठोर शिक्षा होणार नाही अशा नराधमांना जोवरी.... ©कधी प्रेम कधी विरह #feelings