अशी कशी झाली माझी गोची तू माझा मी झाले आता त्याची llधृll स्वप्नांत दळताना गाते तुझे गीत विरहात घुसळताना येते नवनीत स्वप्नातल्या फुलांना मी नित्यवेचीll१ll आठवणीच्या मुसळाने मनावर झाले वार परक्याच्या हाती फसली रे मी गुलनार तुझ्या नेत्रातील शब्द हृदयात टोची ll२ll वटलेल्या झाडाला घालते पाणी बहरलेल्या बागेत शोधते तूझी गाणी आयुष्य संपता संपेल भैरवीची रुची ll३ll #२०००#realstory#prayforher