अरे कोरोना.. - सूरज यादव अरे बाबा कोरोना जा ना रे निघून लवकर.. कंटाळलो आम्ही सगळेजण तुला पाहुण्यांसारखा वाटलेलास.. वाटलं जाशील लवकर पण तू काय जायचं नावच नाय काढत.. अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास.. आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत आणि काय यार काय करायलाच देत नाहीस तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास .. आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस.. आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार ! प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत ना.. काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच मनमोकळे करता येते.! बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे.. म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे.. प्रत्येक वेळेस मुक्यासारखे काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का? तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते? असो. तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल.. नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत.. पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील.. खूप दिवस राहिलास आता.. जा लवकर तू.!! ©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health