Nojoto: Largest Storytelling Platform

आदरणीय महोदय, #विषय: अंतिम वर्षांच्या परीक्षांबा

आदरणीय महोदय, 

#विषय: अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत... 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 
सर वरील विषयास अनुसरून संपूर्ण विश्वात 'कोविड-19' ही वैश्विक महामारी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेली असताना आज प्रत्क्षय व अप्रत्यक्षपणे विद्यार्थी व पालकांमध्ये एक भीतीच वातावरण आहे. मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की अशा वेळी प्रसंगावधान दाखवून आपण सर्व विद्यार्थ्यांना वरील वर्गात पाठविण्याचा योग्य निर्णय घेतला. आपण अंतिम वर्षांच्या परीक्षा देखील रद्द किंवा त्यास पर्यायी उपाय शोधत आहात. पण यामध्ये सर्व अंतिम वर्षांच्या विद्यार्त्यांच्या मनात परीक्षा होईल की नाही, झाली तर कुठं,कशी,कुठल्या पद्धतीने होईल असे असंख्य प्रश्न व संभ्रम आहेत. #आज सर्व महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना #चालू शैक्षणिक वर्ष 2019-20 संपत असताना #नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 ची रूपरेषा आखताना #वसतिगृहातील विद्यार्थी गावी असताना #परिवहनाची साधनं बंद असताना #एकंदरीत परीक्षेंच व्यवस्थापन... अशा अनेक बाबींचा विचार व विनिमय करून योग्य तो विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. तसेच कुलपती म्हणून राज्यपाल महोदय यांना देखील नम्र विनंती की वरील बाबींचा, सर्व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आरोग्य व मानसिक स्थितीचा विचार विनिमय करूनच कृपया योग्य तो निर्णय घ्यावा. 
धन्यवाद, 
आपला विश्वासू...