White नुसताच भिजविणारा पाऊस बहुत झाला एक सर हळूच यावी मन शांत शांत करणारी अज्ञात त्या जगाच्या टोकास काय आहे एक वाट ती मिळावी मज तेथे पोहोचविणारी स्वप्नात रोज माझ्या चेहरे हे ओळखीचे एक मस्त झोप यावी स्वप्नात झोपवणारी रानात कोकीळ गातो हळवाच सुर त्याचा शोधतो मी माणसे ती फक्त सत्य बोलणारी उगाच राग येतो, अश्रू उगाच येती एक आई द्या मला हो मला ओळखणारी ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Random