सागून कधी येत नाही आणि विचारून जात नाही ही वेळ अशी गजब की तिच्यावाचून खेळच नाही प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेपासून सुरू होते, संपते वेळेला जीवनात जे स्थान आहे त्याला तोड नाही वेळ ही अटळ असते कुणाही क्षणात न बांधलेली पकडावे कसे व कुणी; ही कुणासही बाधली नाही अगणित स्वप्न बघतो जो तो आपापल्या धुंदीमध्ये पण काळाचा महिमा तरी कुणालाही चुकला नाही आज जरी सुखवस्तू, निरामय, आनंदात असे सारे मात्र कोणती वेळ कशी येईल; सांगताच येत नाही 'कालाय् तस्मै नमः' म्हणत वेळेलाच शरण जायचे पण वेळेनुसार चालणे फारसे कुणाला जमत नाही काळाच्या प्रवाहात सगळे संदर्भही बदलून जातात बदलाची ही अव्याहत प्रक्रिया कधीच थांबत नाही म्हणूनच आज जे जवळी आहे; त्यास जोड देऊन उन्नती साधण्यावाचून आपल्यालाही गत्यंतर नाही मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine