प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी निवडुंगाचे झुडूप प्रिये... तू तुळशीवाणी सत्त्वशील.. मी आग्याबोंड वेताळ प्रिये... तू विडा रंगीला ताराचा.. मी रसवंतीचा चोथा गं.. प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..