*शब्द* !!! शब्द बोलला जातो, शब्द पाळला जातो, शब्द राखला जातो, एव्हढेच काय ! शब्द दिलाही जातो पण; पाळण्याचे कोणीही कुठेही ठरवलेले नसते ! शब्दाँना किम्मत असते, शब्दांची गमँत असते, शब्दांची दिम्मतही असते, या उपर शब्द बाणही असतो, काळजाचा ठाव आणि घाव शब्दच घेतो ! शब्द भिजलेले, शब्द निजलेले, शब्द भाजलेले, नैतिकतेच्या व्यासपीठावर अनैतिकतेचे हत्यार जेँव्हा शब्द होतात तेँव्हा शब्द खजिलही झालेले असतात ! शब्द धुंद असतात , शब्द मंद असतात , शब्दाना गंधही असतो , पण; राजकिय व्यासपीठावर समाजाला भ्रमिष्ठ करणारे सुद्धा शब्दच असतात ! शब्द लाजाळू , शब्द लाचार , शब्द पराक्रमीही , वीरत्वाची प्रचीतीही शब्दानेच येते ! शब्द बंडाचे निशाण , शब्द बदलाचे वारे , शब्द दिवसाचे तारे , न बोलता सान्गणारेही शब्दच असतात ! प्रपंच शब्दांचा , कल्लोळ भावनांचा , क्षण आपुलकीचा , बांधही शब्दांचा फुटत असतो ! अक्षरत्वाच्या जाणिवेला चंगळवादाने पोखरले आहे , आज सर्वच व्यासपीठावर शब्दानेच वाग्देवतेवर बलात्कार होत आहे ! बलात्कार होत आहे ! ------ *अभ्युदय*