गाव माझं भिजलेलं . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . गाव वेशीच्या मैदानावर कधी लपाछपी , खो - खो तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . गावशाळेत शिकतांना मनात गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . दिसतंय आता अडाणी बापाचं, प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . साथ देणार््या मित्रांच्या आठवणीनं डोळं माझं भरलेलं खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . खरचं खुप सुंदर दिसते